द काश्मीर फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतो, भोपाळी म्हणजे ‘समलैंगिक’ ! | पुढारी

द काश्मीर फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतो, भोपाळी म्हणजे 'समलैंगिक' !

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (vivek agnihotri) हे ‘द काश्मीर फाइल्स’ वरून खूप चर्चेत आले आहेत. दरम्यान त्यांनी एका मुलाखतीमध्ये एक वादग्रस्त विधान केले. विवेक अग्निहोत्रीच्या मते ‘भोपाळी’ या शब्दाचा अर्थ ‘होमोसेक्शुअल असा होतो. हे विधान त्यांने एका माध्यमाला मुलाखत चालू असताना केले.

मी भोपाळचा आहे, पण भोपाळी नाही

या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, मी भोपाळमध्ये वाढलोय, पण भोपाळचा नाहीये, कारण ते वेगळ्या स्वभावाचे असतात, मी तुम्हाला पुन्हा कधीतर याबद्दल सांगेन. तुम्ही हवं असेल तर कोणत्याही भोपाळी व्यक्तीला विचारू शकता. कोणाला तरी सांगितलं की भोपाळी आहे, तर याचा सरळ अर्थ आहे की, तो होमोसेक्श्युअल आहे. म्हणजेच तो नवाबी छंदाचा आहे.

200 कोटी क्लब मध्ये सामील झाली ‘द काश्मीर फाइल्स’

‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा 11 मार्चला सिनेगृहांमध्ये रिलीज करण्यात आला. यामध्ये काश्मीर घाटी पासून पंडितांचे पलायन झालेली गंभीर परिस्थिती पहायला मिळते. हा सिनेमा बॅाक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॅार्ड ब्रेक चांगली कमाई करत आहे. 14 दिवसांमध्ये या सिनेमाने 200 कोटींपेक्षाही जास्त कमाई केलेली आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा 12 कोटी इतक्या कमी बजेटमध्ये बनवला गेलेला असतानाही चांगली कामगिरी केलेली आहे.

हेही वाचा

Back to top button