Bollywood : १४ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये होणार धमाका! एकाच दिवशी प्रदर्शित होणार 'हे' ४ चित्रपट

सनी देओलपासून साऊथचा सुपरस्टार सूर्या यांच्यापर्यंत अनेक मोठे कलाकार आपल्या चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Bollywood News
Bollywood : १४ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये होणार धमाका! एकाच दिवशी प्रदर्शित होणार 'हे' ४ चित्रपटfile photo
Published on
Updated on

14 august these 4 movies are releasing sunny deol batwara 1947 awarapan 2 more

पुढारी ऑनलाईन : सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी! स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १४ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये ४ जबरदस्त चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सनी देओलपासून साऊथचा सुपरस्टार सूर्या यांच्यापर्यंत अनेक मोठे कलाकार आपल्या चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सिनेरसिकांसाठी खास ठरणार आहे.

Bollywood News
Earthquake : रुग्णांची सर्जरी सुरू असताना ७.१ तीव्रतेचा भूकंप; ऑपरेशन थिएटर हादरलं, यावेळी डॉक्टरानी जे केलं ते पहा.. VIDEO

१५ ऑगस्टच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना लाँग वीकेंड आणि सणाच्या सुट्टीचा मोठा फायदा मिळतो. त्यामुळे आगामी काळात बॉक्स ऑफिसवर काही दमदार चित्रपटांची एन्ट्री होणार आहे. सरकारी सुट्टी आणि त्यानंतर येणारा वीकेंड यामुळे या चित्रपटांना चांगली ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत १५ ऑगस्टच्या आसपास प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच १४ ऑगस्टला प्रदर्शित होणारे हे चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करू शकतात.

बटवारा १९४७

आमिर खान यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेला ‘बटवारा १९४७’ हा या आठवड्यातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात जाण्यास भाग पडलेल्या एका मुस्लिम व्यक्तीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

चित्रपटात शबाना आझमी हिंदू-पाकिस्तानी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रीती झिंटा, करण देओल आणि अली फजल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सनी देओलसाठी १५ ऑगस्टचा काळ नेहमीच खास राहिला आहे. त्यांच्या ‘गदर २’ या चित्रपटानेही स्वातंत्र्यदिनाच्या काळात बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला होता.

Bollywood News
Dog-Cobra Fight : मालकाच्या घराचा पहारेकरी ठरला ‘योद्धा’; कोब्राला रोखले पण..

आवारापन २

इमरान हाश्मीचा ‘आवारापन २’ हा सनी देओलच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. इमरान हाश्मी पुन्हा एकदा त्याच्या जुन्या अंदाजात दिसणार आहे. त्याला या भूमिकेत पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे सनी देओल आणि इमरान हाश्मी यांच्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ‘अपने’ आणि ‘आवारापन’ या चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी दोघांच्या चित्रपटांमध्ये स्पर्धा झाली होती. त्या वेळी सनी देओल यांचा चित्रपट आघाडीवर राहिला होता.

द एंड ऑफ ओक स्ट्रीट

१४ ऑगस्ट रोजी ‘द एंड ऑफ ओक स्ट्रीट’ हा अमेरिकन सायन्स फिक्शन चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अॅन हॅथवे, इवान मॅकग्रेगर, मॅसी स्टेला आणि ख्रिश्चन कॉनवेरी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सायन्स फिक्शन आणि मनोरंजनाची आवड असलेल्या प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटांसोबत हा हॉलीवूडपटही बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडू शकतो.

विश्वनाथ अँड सन्स

१४ ऑगस्ट रोजी ‘विश्वनाथ अँड सन्स’ हा तमिळ-तेलुगू ड्रामा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची कथा ऑलिम्पिक स्तरावरील ४० वर्षीय नेमबाजाच्या आयुष्याभोवती फिरते.

नातेसंबंधांमध्ये अडकलेल्या या व्यक्तीची भावनिक आणि संघर्षमय जर्नी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे सूर्या यांच्या चाहत्यांसाठीही हा चित्रपट विशेष ठरणार आहे.

१४ ऑगस्टला या चार चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. आता यापैकी कोणता चित्रपट प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळवतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news