कौन प्रवीण तांबे : अभिनेत्री अंजली पाटील विषयी माहितीये का?

anjali patil
anjali patil

पुढारी ऑनलाईन डेस्क  : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेचा 'कौन प्रवीण तांबे?'(Kaun Pravin Tambe?) हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच श्रेयस तळपदेचा दमदार अभिनय पाहून सर्वांनाचा चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटात श्रेयससोबत अभिनेत्री अंजली पाटील दिसणार आहे. तुम्हाला माहितीये का अंजली पाटील कोण आहे?

श्रेयस आणि अंजली यांच्या नव्या चित्रपटाचे नाव कौन प्रवीण तांबे असे आहे. हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या कारकिर्दीवर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयसने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. श्रेयसने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हा ट्रेलर शेअर केला आहे.

श्रेयसने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केलाय. त्यात लिहिले आहे की, 'फक्त अजून एक ओव्हर' करत करत ते जगाच्या सर्वात मोठ्या लीगपर्यंत पोहोचले. वाह प्रवीण तांबे. काय स्टोरी आहे तुमची! ते म्हणतात, अजूनही उशीर झालेला नाही. फक्त इच्छा असायला हवी. आम्ही घेऊन येत आहोत क्रिकेटच्या सर्वात अनुभवी नवोदित खेळाडूची न ऐकलेली कथा, 'कौन प्रवीण तांबे?'या ट्रेलरमध्ये अंजलीची देखील झलक पाहायला मिळते.

चित्रपट ट्रेलर डिज्नी प्लस हॉटस्टारच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. यासोबत लिहिण्यात आले होते की, 'वयाच्या ४१ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राईट-आर्म्ड लेग स्पिनर असणाऱ्या प्रवीण तांबेची ही गोष्ट आहे. ते कधीही कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणीतील क्रिकेट खेळले नाहीत. पण त्यांनी त्यांच्या नशीबाविरूद्ध लढा दिला आणि त्यात विजयी झाले'.

कोण आहे Anjali Patil?

अंजली ही प्रकाश झा यांचा चित्रपट चक्रव्यूहमध्ये दिसली होती. नंतर ती ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट 'न्यूटन'मध्ये राजकुमार रावसोबत दिसली होती. अंजलीचा जन्म २६ सप्टेंबर, १९८७ रोजी झाला. ती एक थिएटर अभिनेत्री आहे. ती चक्रव्यूह या चित्रपटात तसेच श्रीलंकन चित्रपट यू विदाऊट यूमध्येही दिसली होती.

तिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे २०१२ मध्ये सिल्व्हर पिकॉक हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने तेलुगू चित्रपट Na Bangaaru Talli मध्ये काम केले. वयाच्या १४ व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या पालकांनी तिला पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये प्रवेश मिळवून दिला होता.

जून २००७ मध्ये, तिने बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये सुवर्ण पदकासह पदवी मिळवली. नंतर, तिची नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये थिएटर डिझाईनमध्ये मास्टर्स करण्यासाठी निवड झाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news