रणबीर-आलियाचे लग्न ‘या’ महिन्‍यात ?

alia bhatt and ranbir kapoor
alia bhatt and ranbir kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, आपल्या चित्रपतांबरोबरचं आपल्या पर्सनल लाईफमुळे खूप चर्चेत असते. अभिनेत्री आलिया गेल्या ५ वर्षांपासून रणबीर कपूरला डेट करत आहे. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. आता सर्वांनाच हे दोघे लग्न कधी करणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांच्या लग्नाच्या तारखा समोर येत आहेत. पण, याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता हे लव्हबर्ड्स यावर्षी लग्नबंधनात अडकतील, असे वृत्त समोर आले आहे.

रिपोर्टनुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये दोघे लग्न करणार असल्याची माहिती समोर आलीय. आलिया आणि रणबीरचे लग्न गेल्या वर्षी होणार होते. पण कोरोना महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर या वर्षी एप्रिल महिन्यात दोघे लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले. पण, नंतर एप्रिलमध्ये ते लग्न करणार नसल्याची पुष्टी करण्यात आली. आता कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी ठरवलं आहे की, रणबीर आणि आलिया यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न करणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे ऑक्टोबर २०२२ मध्ये लग्न करू शकते. दोघांनीही लवकरच लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. दोघेही सध्या आपापले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. जो १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. यानंतर आलिया 'आरआरआर' चित्रपटात ती दिसणार आहे. त्याचबरोबर 'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय आलियाकडे 'रॉकी आणि राणीची प्रेमकथा', 'डार्लिंग्स' हे चित्रपटदेखील आहेत.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news