कच्चा बदाम : कार शिकायला गेलेल्या ‘कच्चा बदाम गायकाचा’ अपघात

कच्चा बदाम : कार शिकायला गेलेल्या ‘कच्चा बदाम गायकाचा’ अपघात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'कच्चा बदाम' हे गाणे गाणाऱ्या भुबन बदायकरचा अपघात झाला. हे समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाने अनेकांना स्टार बनवले आहे, त्यातील एक म्हणजे भुबन बदायकर. त्याचे 'कच्चा बदाम' हे गाणे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले. या गाण्यानंतर भुबन बदायकर रातोरात स्टार झाला. मात्र त्याचा अपघात झाला, हे समजल्यानंतर त्याच्या चाहते वर्गामध्ये चिंताजनक परिस्थिती पहायला मिळाली. सोमवारी रात्री झालेल्या अपघातात त्याला अनेक ठिकाणी दुखापत झाली.

भुबन शिकत होता कार

'कच्चा बदाम' हे गाणे गाणाऱ्या भुबन बदायकरचा भीषण कार अपघातात झाला. हा अपघात पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे झाला. त्याला पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायक भुबन बदायकर कार हा चालवायला शिकत होता, त्याच दरम्यान त्याच्यासोबत हा अपघात झाला. भुबन बदायकरने नुकतीच एक नवी कार खरेदी केली आहे.  या अपगघातात त्याच्या छातीवर तसेच शरीराच्या इतर भागात दुखापत झाली. सोशल मीडियावरील चाहते भुवनच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

भुबन बदायकर हा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरलजुरी गावचे आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले व एक मुलगी असा परिवार आहे. भुबन आजवर शेंगदाणे विकून आपला उदरनिर्वाह करत असे. यावेळी शेंगदाणे विकण्यासाठी त्यांनी 'कच्चा बदाम' हे गाणे बनवले आणि स्वतःच्या स्वरबद्ध सुरात गायला सुरुवात केली.

भुबन बदायकरचे हे गाणे कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केले, त्यानंतर हे गाणे इतके व्हायरल झाले की शेंगदाणे विक्रेता म्हणून ओळख असलेला भुबन रातोरात देशात आणि जगात प्रसिद्ध झाला. यानंतर भुबन इतका प्रसिद्ध झाला की एका म्युझिक कंपनीने त्याला लाखो रुपयांचा चेक दिला आणि त्याच्यासोबतचा एक म्युझिक व्हिडिओही रिलीज केला. काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री हिना खाननेही त्याच्या या गाण्यावर डान्स केला होता.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news