Vijay Deverakonda : रश्मिकासोबतच्या अफेअरवर देवरकोंडाचा मोठा खुलासा

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna
Vijay Deverakonda-Rashmika Mandanna
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अर्जुन रेड्डी अभिनेता विजय देवरकोंडा ( Vijay Deverakonda ) आणि डिअर कॉम्रेड फेम रश्मिका मंदाना यांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चा चांगल्याचं रंगल्या आहेत.हे दोघे यावर्षी लग्नही करणार असल्याचं म्हटलं जातयं. दरम्यान, आता विजय देवरकोंडा या दाक्षिणात्य अभिनेत्याने रश्मिका सोबतच्या अफेअरबाबत मोठा खुलासा केला आहे. ( Vijay Deverakonda)

देवरकोंडाने एक ट्विट केलं आहे. त्याला काय म्हणायचंय हे या ट्विटमधून स्पष्ट होतंय. देवरकोंडा यांने अप्रत्यक्षरित्या एक ट्विट केलं आहेय आणि या अफवा असून अशा कशा बातम्या देऊ शकता, असे म्हटलं आहे. त्याने म्हटलंय -As usual nonsense.. Don't we just ❤️ da news! या ट्विटसोबत त्याने एक हार्ट इमोजीदेखील टाकलं आहे.

काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली की, विजय आणि रश्मिका डेटिंग करत आहेत. दोघे लवकरचं लग्नगाठ बांधणार आहेत. पण, दोघांकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. आणि चाहत्यांना नेमकं खरं काय आहे, हे स्पष्ट झालं नव्हतं.

या ट्विटमुळे तर कन्फर्म झालं आहे की, तो रश्मिकाला डेट करत नाहीये. त्यामुळे दाेघांबाबतकेवळ अफवा पसरल्या होत्या. दोघांनी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावरही घेतलं होतं.

देवरकोंडाने हे देखील स्पष्ट केलेलं नाही की, रश्मिकासोबतची त्याची फ्रेंडशीप कशी आहे? तो आणि रश्मिका अनेकदा एकत्र दिसले आहेत. तर जिमलादेखील दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत.

देवरकोंडाचा लायगर चर्चेत

देवरकोंडाचा लायगर हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. माईक टायसन आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केला आहे. तर रश्मिकाकडे दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. मिशन मजनू या आगामी चित्रपटात ती सिध्दार्थ मल्होत्रासोबत दिसेल. तसेच गुडबाय या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासमवेत दिसेल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news