भन्साळींकडे केली आलियाची तक्रार | पुढारी

भन्साळींकडे केली आलियाची तक्रार

पुढारी ऑनलाईन

आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट 25 फेब्रुवारीला रीलिज होणार आहे. या चित्रपटासाठी आलियाने इतकी मेहनत घेतली की, तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरला खूप त्रास सहन करावा लागला. नुकतेच एका मुलाखतीत या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सांगितले की, आलिया या भूमिकेत घुसली होती. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने माझ्याकडे तक्रार केली होती की, आलिया घरातही गंगुबाईसारखीच बोलते. मला माहिती नव्हते की, आलिया एक उत्तम डान्सर आहे. ‘ढोलदा’ गाण्याच्या शूटिंगवेळी जाणवले की, ती या कॅरेक्टरमध्ये किती घुसली आहे. परकाया प्रवेश यापेक्षा वेगळा काय असतो? अर्थात, याचा रणबीरला त्रास झाला असेलच.

Back to top button