Singer-composer Bappi Lahiri : पंतप्रधान यांच्यासह मान्यवरांची बप्पी लहरी यांना श्रध्दांजली | पुढारी

Singer-composer Bappi Lahiri : पंतप्रधान यांच्यासह मान्यवरांची बप्पी लहरी यांना श्रध्दांजली

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Singer-composer Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या जाण्याने कलाविश्वातील आणखी एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील वर्षी बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यातून ते बरे झाले आहेत.

पंतप्रधान यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत बप्पी लहरी ((Singer-composer Bappi Lahiri) यांना श्रध्दांजली वाहिली आहे. ‘बप्पी लहरीजी यांचे संगीत सर्वसमावेशक असं होते, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणाऱ्यांपैकी ते एक होते. पिढ्यानपिढ्या अनेक लोक त्यांच्या कार्याशी संबंधित आहेत. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

Back to top button