वनिता आणि ओंकारचा येतोय ‘ लकडाऊन बी पॉझिटिव्ह ‘ | पुढारी

वनिता आणि ओंकारचा येतोय ' लकडाऊन बी पॉझिटिव्ह '

पुढारी ऑनलाईन; अभिनेत्री वनिता खरात आणि ओंकार राऊत यांची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रामधून चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. वनिता आणि ओंकार राऊत यांचा ‘ लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चाहत्याच्या भेटीस येत आहे.

कलाकृती कोणतीही असो व कोणतंही माध्यम, एकांकिका करणाऱ्या या कलाकारांनी नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडली. वनिता खरात आणि ओंकार राऊत ही दोन नाव प्रामुख्याने या संदर्भात घेतली जातात. एकांकिका विश्वात आपली छाप पडल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये दोघेजण दिसत आहेत. आता पुढचा टप्पा गाठत हे दोघेही ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटात दिसून येणार आहेत.

संतोष मांजरेकर यांच्या दिग्दर्शनाने सज्ज असा लकडाऊन हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. वनिता खरात आणि ओंकार राऊत या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या दोघांच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी याच्यासोबत हे दोघे कलाकार देखील झळकणार आहेत. लकडाऊन हा चित्रपट विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असून ओंकार यात अंकुश चौधरी याच्या लहान भावाची भूमिका साकारत आहे. तर वनिताच्या भूमिका ही अजून गुलदस्त्यात आहे.

वनिता आणि ओंकार हे दोघेही एकांकिका माध्यमाशी संलग्न असून या चित्रपटाच्या निमित्ताने दोन एकांकिका रंगकर्मींना मोठ्या पडद्यावर संधी मिळाली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने वनिता आणि ओंकार दोघें ही तब्बल महिनाभर जुन्नर येथे होते. पहिल लॉकडाऊन निघाल्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. कोरोनाचे सर्व नियम पाळत या चित्रपटाचे शूटिंग पार पडले आहे.

या चित्रपटाचे वैशिष्ट म्हणजे, या चित्रपटात अंकुश, प्राजक्ता, वनिता आणि ओंकारसोबत तब्बल १२ नामवंत कलाकार असणार आहेत. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मिता स्मिता खरात असून चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे. शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे. तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button