

पुढारी ऑनलाईन
अजय देवगण आणि राशी खन्ना यांची क्राईम थ्रीलर वेबसीरिज 'रूद्र ः द एज ऑफ डार्कनेस'चा ट्रेलर रीलिज झाला असून ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 4 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
हॉलीवूड अभिनेता इद्रिस एल्बा याची ब्रिटिश वेबसीरिज 'लुथर'चा हा हिंदी रिमेक आहे. राजेश मापुस्कर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सीरिजमध्ये ईशा देओल, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, आशिष विद्यार्थी यांच्याही भूमिका आहेत. अजय देवगण या सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज स्ट्रीम होणार आहे.
अजय देवगणने यात एसीपी रूद्रवीर सिंग ही भूमिका साकारली आहे. जो एका खतरनाक गुन्हेगाराचा शोध घेत आहे. तर राशीने सायकोपॅथ असलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. ती अजयसोबत माईंडगेम करताना दिसून येते. ईशा देओलने यात अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरिज हिंदीसह मराठी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, बांगला भाषेत रीलिज होणार आहे.
दरम्यान, राशी खन्ना बॉलीवूडमध्ये करण जोहरच्या प्रोडक्शनद्वारे बनत असलेल्या 'योद्धा'द्वारे पदार्पण करत आहे. त्यात सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.