मिथुन-श्रुती हासनची वेबसीरिज ‘बेस्टसेलर’ | पुढारी

मिथुन-श्रुती हासनची वेबसीरिज ‘बेस्टसेलर’

पुढारी ऑनलाईन

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री श्रुती हासन यांची एक सायकोलॉजिकल थ्रिलर वेबसीरिज येत आहे. ‘बेस्टसेलर’ असे या सीरिजचे नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच रीलिज झाला आहे. मुकुल अभ्यंकरने या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. सीरिजमध्ये अर्जुन बाजवा, गौहर खान, सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत.

18 फेब्रुवारीपासून ही सीरिज ओटीटीवर स्ट्रीम होत आहे. एका मोठ्या साहित्यिकाचे मार्गदर्शन घेऊन काही लिहू इच्छित असलेल्या एका नव लेखिकेलाच तो साहित्यिक कादंबरीत घेतो. आता तो ‘बेस्टसेलर’ लिहितो का, हे सीरिजमधून उलगडणार आहे. या सीरिजमधून मिथुन आणि श्रुती यांचे डिजिटल स्पेसमध्ये पदार्पण होत आहे.

 

Back to top button