आई मायेचं कवच : सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार मीनाक्षीसमोर येणार? | पुढारी

आई मायेचं कवच : सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार मीनाक्षीसमोर येणार?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘आई मायेचं कवच’ मालिकेला नवे वळण मिळणार आहे. सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार मीनाक्षीसमोर येणार? कसा असेल मीनाक्षीचा पुढचा प्रवास? हे प्रेक्षकांना मालिकेतून पाहता येणार आहे.

धकाधकीच्या जीवनात आईचे प्रेम कळत नाही किंवा कळून देखील न कळल्याचा आव आणतो. कारण आपले स्वातंत्र्य त्यापुढे अधिक महत्त्वाचे वाटते. असेच काहीसे सुहानीसोबत घडताना दिसते. जन्मदात्या आईवर विश्‍वास न ठेवता सुहानीला बाहेरचे जग प्रिय वाटते. पण आता सुहानीच्या नकळतच तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो. वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचे रान करते. अनेक पुरावे हाती लागून सुद्धा सुहानी मिळत नाही. बर्‍याचदा जवळचा माणूस संशयित म्हणून समोर येतो, त्याक्षणी देखील मीनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसते.

आता मात्र मालिकेला नवे वळण मिळणार आहे. कारण सुहानीला गायब करणारा खरा सूत्रधार सापडणार आहे. बेपत्ता असलेल्या सुहानीच्या शोधात असताना तिला सुशांत विरोधात देखील पुरावा सापडणार आहे. आता पुरावा काय असेल? चांदेकर यामागे असून सुहानी त्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे. या कटात नक्‍की चांदेकरचा हात आहे, या सत्यापर्यंत ती कशी पोहचणार? कसा असेल मीनाक्षीचा पुढचा प्रवास जाणून घेण्यासाठी ‘आई मायेचं कवच’ मालिका पाहावी लागणार आहे. आता मीनाक्षी त्याच्यापर्यंत कशी पोहचेल ? चांदेकर या सगळ्यामागे हे मीनाक्षीला कधी समजेल? लोखंडे आणि मीनाक्षी मिळून सुहानीला कसे सोडवणार? सुहानीपर्यंत पोहोचण्याचा मीनाक्षीला मार्ग सापडणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Back to top button