Shahrukh Khan : शाहरुख खानच्या समर्थनात उतरली उर्मिला मातोंडकर | पुढारी

Shahrukh Khan : शाहरुख खानच्या समर्थनात उतरली उर्मिला मातोंडकर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकारण, खेळ यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींसह बॉलिवूडच्या सिनेतारकांनी देखिल हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) तिच्या मॅनेजर पूजा ददलानी हिच्यासह पोहचला होता. यावेळी या दोघांनी पार्थिव शरीरावर फूले वाहून श्रद्धांजली देखिल वाहिली. या दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान हा प्रार्थना करताना दिसत आहे. त्यानंतर तो आपला मास्क बाजुला करुन फुंकताना दिसत आहे. या कृतीला घेऊन शाहरुख खानला सध्या एका वर्गाकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. आता या सगळ्या प्रकरणात उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने उडी घेतली आहे. तिने शाहरुख खान याच्या कृतीचे समर्थन करत त्याचे समर्थन केले आहे.

या प्रकरणी उर्मिला मातोंडकर हिने म्हटले आहे, ज्या अभिनेत्याने जगभरात आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. त्याच्या विषयी तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर कसे बोलू शकता. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर घसरलेले आहे, हे पाहून खूप दु:ख वाटते. तिने एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे, ‘ एक समाज म्हणून आपण इतक्या खाली पर्यंत घसरलो आहे की, प्रार्थना केल्यावरही ते आपल्याला थुंकण्याप्रमाणे वाटते. आपण एका अशा अभिनेत्या विषयी बोलत आहात ज्याने आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर पोहचलेले पाहून मनाला खूप वाईट वाटते. (Shahrukh Khan)

ट्वीट करुन दिले उत्तर (Shahrukh Khan)

या आधी उर्मिलाने एक ट्वीट करुन तिने लिहले, ‘‘थुंकणे नाही, प्रार्थनेची फुंकर आहे. या सभ्यता आणि संस्कृतीलाच भारत असे म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिका. या भारतमातेच्या मुलीचे हे गाणं ऐका,“ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान। सारा जग तेरी सन्तान.’’

या ट्वीटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दरगाहला दिलेल्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काहीतरी शिका असे सुद्धा सांगितले आहे.

Back to top button