‘पुष्‍पा’च्या श्रीवल्‍लीवर रानू मंडलचा डान्स; लोकं म्‍हणाली, ‘अल्‍लू अर्जुनपर्यंत पोहोचलाचं पाहिजे’

‘पुष्‍पा’च्या श्रीवल्‍लीवर रानू मंडलचा डान्स; लोकं म्‍हणाली, ‘अल्‍लू अर्जुनपर्यंत पोहोचलाचं पाहिजे’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क 

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्‍पा द राइज' (Pushpa The Rise) हा चित्रपट दर्शकांना चांगलाच भावला. सोशल मीडियावर 'पुष्‍पा' च्या गाण्यापासून डायलॉग्‍स पर्यंत सर्वकाही जोरात व्हायरल होत आहे. त्‍यातच पुप्पा चित्रपटातील श्रीवल्‍ली गाण्यावर रानू मंडलचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर (Ranu Mondal) रानू मंडलचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्‍यामध्ये ती श्रीवल्‍ली गाण्यावर थीरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक हसून चूर होत आहेत.

रानू मंडलचा व्हिडिओ व्हायरल… 

या व्हिडिओमध्ये रानू मंडल पुष्पाच्या श्रीवल्ली गाण्यावर मजेदार पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. रानूच्या या मजेदार डान्सवर चाहते मनापासून कमेंट करत आहेत. रानू यांच्या फनी डान्स स्‍टेप्स पाहून चाहत्‍यांना हसू आवरणे कठीण जात आहे. काही सोशल मीडिया यूझर्संचा म्‍हणण आहे की, हा व्हिडिओ अल्‍लू अर्जुन पर्यंत पोहोचवायचा आहे.

राणू मंडल इंटरनेट सेन्सेशन बनली होती… 

एकेकाळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणे गाणारी रानू मंडल रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली होती. लोकांनी रानू मंडलला लता मंगेशकर यांचे 'एक प्यार का नगमा है' गाताना ऐकले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या चित्रपटातील एका गाण्याची संधी दिली होती. मात्र, त्यानंतर रानू मंडल गायब झाली. गतवर्षी रानू मंडलवर चित्रपट बनत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 'मिस राणू मारिया' असे या चित्रपटाचे नाव असून हृषिकेश मंडल दिग्दर्शित करत आहेत.

कोण आहे अभिनेत्री? 

बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री इशिका डे बायोपिकमध्ये राणू मंडलची मुख्य भूमिका साकारत आहे. एका वृत्‍त संस्‍थेशी बोलताना इशिकाने सांगितले होते की, चित्रपटाचे शूटिंग कोलकाता आणि मुंबईत केले जाणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्तीचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं, पण लॉकडाऊनमुळे शेड्युलच्या तारखांमध्ये अडचणी आल्या आणि त्यानंतर इशिकाची निवड करण्यात आली. इशिका 'लाल कप्तान' आणि वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'मध्ये दिसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news