Mia Khalifa म्‍हणाली मी अजुनही मेलेली नाही… मृत्‍यूच्या अफवांना दिले असे उत्‍तर | पुढारी

Mia Khalifa म्‍हणाली मी अजुनही मेलेली नाही... मृत्‍यूच्या अफवांना दिले असे उत्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

सोशल मीडियावर कधी कोणती अफवा पसरेल याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रत्‍यय मॉडेल (Mia Khalifa) मिया खलीफाला आला. मिया खलीफाच्या निधनाच्या बातम्‍या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्‍या, यामुळे तिच्या फॅन्सना धक्‍काचं बसला. मात्र या गोष्‍टीची जेव्हा (Mia Khalifa) मिया खलिफाला माहिती मिळाली, तेव्हा तिने सर्व शंका दूर केल्‍या. एका मीमव्दारे तिने सांगितले की, अजुन मी जिवंत आहे. तेव्हा कुठे मियाच्या चाहत्‍यांच्या जीवात जीव आला.

मीमद्वारे दिले उत्‍तर…

(Mia Khalifa) मिया खलीफाने ट्विटरवर एक मीम शेयर केले. या मीमव्दारे तिने मृत्‍यूच्या अफवांचे खंडन केले. मी अजुन मेलेली नाही. माझी तब्‍येत चांगली असल्‍याची माहिती दिली. हा मेसेज वाचून मियाचे चाहते खुश झाले. यामुळे तिच्या चाहत्‍यांच्या जीवात जीव आला.

एका यूजरने लिहिलंय, वेलकम बॅक मिया. मला आनंद आहे की तुम्‍ही पुन्हा आलात. आम्‍ही तुम्‍हाला मिस केले. एका दुसऱ्या व्यक्‍तीने यावर लिहिलंय की, तुम्‍हाला पाहून आनंद झाला. चाहते हार्टचे इमोजी शेयर करत आहेत. काही लोक त्‍यांच्या मीम्‍स शेअर करत आहेत. जे मीम मियाने शेअर केले आहे तो १९७५ साली प्रदर्शित झालेला मॉन्टी पॅथॉन अँन्ड ग्रेल या चित्रपटातील आहेत.

सोशल मीडियावर बरेच चाहते…

मिया खलिफा जगभरात प्रसिध्द आहे. सोशल मीडियावरही ती चर्चेचा विषय असते. फेसबूकवर मिया खलिफाचे ४.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्‍टाग्रामचे बोलायचे झाले तर, त्‍यावर २६.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर तीचे ४.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. ही काही पहिली वेळ नाही ज्‍यात एखाद्या सेलिब्रिटींच्या मृत्‍यूची अफवा पसरली आहे. यापूर्वी, अर्नोल्ड श्वार्झनेगर, जॅकी चॅन आणि जिम कॅरी यांच्यासह अनेक अभिनेत्यांच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरल्या होत्या.

Back to top button