BIGG BOSS 15 : मसाज करायला गेलेल्या शमिताची तेजस्वीने खेचली टांग | पुढारी

BIGG BOSS 15 : मसाज करायला गेलेल्या शमिताची तेजस्वीने खेचली टांग

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १५  ( BIGG BOSS 15 ) मध्ये तेजस्वी प्रकाश आणि शमिता शेट्टी यांच्यातील भांडणे शोच्या सुरुवातीपासून सुरू आहेत. सध्या बिग बॉस १५ ला काहीच दिवस शिल्लक आहेत. परंतु, तेजस्वी प्रकाश आणि शमिता यांच्यातील भांडणे मिटण्या ऐवजी याउलट जोरजोरात भांडणे होत आहेत. सध्या या शोत करणचा मसाज करायला गेलेल्या शमिताची तेजस्वीने टांग खेचली असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

नुकताच तेजस्वी प्रकाश आणि शमिता शेट्टी याच्यातील बिग बॉस ( BIGG BOSS 15 ) घरात पुन्हा एकदा एकमेकांशी भांडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बिग बॉस १५ च्या टास्कमध्ये करण कुंद्राने शमिता शेट्टीला मसाज करायला सांगितले. यानंतर शमिताने करणचा मसाज करण्यास सहमती दर्शविली. याच दरम्यान शमिताने करणला मसाज द्यायला सुरुवात करताच तेजस्वी प्रकाशचा रागाचा पारा चढला आणि तिने शमिता शेट्टीचा पाय पकडून तिला खाली खेचले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक चाहत्यांनी वेगवेगल्या कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने तेजस्वीची हे वागणे अजिबात आवडली नसल्याचे म्हटले आहे. तर काही चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. या घटनेमुळे तेजस्वीला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

याआधीही तेजस्वी आणि शमिता दोघीमध्ये टास्कदरम्यान जोरजोरात भांडणे झाली आहेत. यावेळी तेजस्वीने शमिताला आंटी अशी हाक मारली होती. ज्यावर अनेक सेलिब्रिटींनी तिचा क्लासही घेतला होता. बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानपासून ते अभिनेत्री बिपाशा बसूपर्यंत अनेक कलाकारांनी तेजस्वीला चांगलेच धारेवर धरले होते.

या घटनेबद्दल बिपाशा बसूने आपली प्रतिक्रिया दिली होती. बिपाशाने सोशल मीडियावर एक ट्विट करत लिहिले होते की, ‘एखाद्याशी अशी वागणुक दिल्यानंतर त्याची माफी मागणे दयनीय आहे. परंतु, असे लोक विजेता होण्यासाठी कसेही वागत असतील तर हे खेदजनक आहे. जर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, तर इतर मुलींना खाली ओढण्या ऐवजी स्वत: च्या माणसाला प्रश्न विचारा.’ असे लिहिले आहे.

त्याचवेळी गौहर खाननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस्वीच्या या वृत्तीवर प्रश्न उपस्थित करत हे आवडले नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

(VIDEO : colorstv instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Back to top button