Republic Day 2022 : आमिरच्या 'लगान' ते जॉनच्या 'परमाणु'पर्यंत पाहा हे ६ चित्रपट | पुढारी

Republic Day 2022 : आमिरच्या 'लगान' ते जॉनच्या 'परमाणु'पर्यंत पाहा हे ६ चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने अनेक चित्रपट रिलीज केले जातात. कोरोनामुळे यावर्षी अनेक राज्यांमध्ये थिएटर्स बंद करण्यात आले आहेत. (Republic Day 2022) तर काही राज्यांमध्ये ५० टक्के क्षमतेने थिएटर्स सुरू आहेत. अशावेळी आज आम्ही तुम्हाला देशप्रेम आणि देशभक्तीपर चित्रपटांविषयी सांगणार आहोत. (Republic Day 2022)

रंग दे बसंती (Rang De Basanti)

राकेश ओमप्रकाश मेहराद्वारा दिग्दर्शित पाच तरुणांची कहाणी दाखवण्यात आलीय. जे सरकारच्या भ्रष्टाचारविरोधात लढतात. ‘रंग दे बसंती’मध्ये आमिर खान, सिद्धार्थ, कुणाल कपूर, शरमन जोशी, अतुल कुलकर्णी आणि आर माधवन मुख्य भूमिकामध्ये हाेते.

शेरशाह (Shershaah)

विष्णुवर्धन दिग्दर्शित या चित्रपटामध्ये कॅप्टन विक्रम बत्राच्या वीरता या कथेतून दर्शवण्यात आलीय. चित्रपटामध्ये ‘शेरशाह’ सिद्धार्थ कपूर हा कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत आहे. याशिवाय, कियारा आडवाणी देखील मुख्य भूमिकेत होती.

लगान (Lagaan)

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित लगान चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, भुवन नावाचा एक शेतकरी ब्रिटिश काळातील कॅप्टन अँड्रयू रसेलचे आवाहन स्वीकारतो. क्रिकेटचा सामना जिंकत संपूर्ण गावाला ब्रिटिश करातून मुक्त करतो.

परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण (Parmanu: The Story Of Pokhran)

अभिषेक शर्माच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट १९९८ मध्ये पोखरणमध्ये भारतीय लष्कराद्वारे केल्या गेलेल्या अणू बॉम्ब परीक्षण विस्फोटवर आधारित आहे. या पीरियड ड्रामा ॲक्शन चित्रपटात जॉन अब्राहम, डायना पेंटी आणि बोमन इरानी मुख्य भूमिकेत आहे.

फँटम (Phantom)

फँटम कबीर खान दिग्दर्शित हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये सैफ अली खान आणि कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.

क्रांतीवीर (Krantiveer)

मेहुल कुमारद्वारा स्टारर हा चित्रपट भ्रष्टाचार आणि त्याच्या परिणामांवर प्रकाश टाकतो. चित्रपटामध्ये नाना पाटेकर, ममता कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button