Ananya Panday : अनन्या पांडेला शॉर्ट ड्रेसमध्ये लागली थंडी अन्… (Video) | पुढारी

Ananya Panday : अनन्या पांडेला शॉर्ट ड्रेसमध्ये लागली थंडी अन्... (Video)

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा ( Ananya Panday) आगामी ‘गहराईयां’ ( Gehraiyaan ) या चित्रपट येत्या ११ फेब्रुवारी २०२२ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटातील कलाकारांनी जोरदार प्रमोशनास सुरूवात केली आहे. या दरम्यान अनन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकताच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ‘गहराईयां’ चित्रपटाचा प्रमोशनसाठी एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दीपिका पादुकोण, शकुन बत्रा, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने घातलेल्या ड्रेसची चर्चां झाली. यावेळी दीपिकाने ऑरेंज रंगाच्या कट आऊट मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. याच दरम्यान अनन्याने ( Ananya Panday) ब्रालेट आणि ऑफ व्हाइट पँट ड्रेसमध्ये दिसली. या शॉर्ट ड्रेसमुळे अनन्याला चक्क थंडीने हुडहुडी भरली आहे.

प्रमोशनदरम्यान ताज हॉटेलच्या बाहेर खूपच थंडी होती. या मोसमात अनन्या आल्यावर तिला थंडीने थरथर कापू लागली. ताबोडतोब ही घटना जवळच फोटोसाठी उभारलेल्या सिद्धांत चतुर्वेदीच्या लक्षात आली. यानंतर त्याने आपले जॅकेट काढून अनन्याला दिले. एवढेच नव्हे तर, त्याने तिला ते परिधान ही करायला लावले. ही घटना चित्रपटातल्या सीनसारखी होती. याचवेळी दोघांच्यावर कैमेऱ्याची नजर पडली.

हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस करत सिद्धांतचे कौतुक केले आहे. यात एका युजर्सने ‘चित्रपटातील सीन सारखे ही घटना घडली आहे’ असे म्हटले आहे. नुकतेच ‘गहराईयां’ चित्रपटातील ‘डूबे डूबे’ हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात दीपिका आणि सिद्धांतचा किसिंग सिंग दाखवला आहे. या गाण्याला अंकुर तिवारी, कबीर कथपालिया आणि सवेरा यांनी संगीत दिले आहे. कौसर मुनीर हे गीतकार आहेत. यांनी लिहिले असून लोथिका झा यांनी गायिले आहे.

हेही वाचलंत का? 

(video ; viralbhayani instagram वरून साभार)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

Back to top button