South Star Education : कुणाचं १२ वी शिक्षण तर कुणी ...

पुढारी ऑनलाईन
South Star Education – ‘पुष्पा’ चित्रपटाने सर्वांच्या मनावर रुंजी घातलीय. सामी सामी, श्रीवल्ली यासारख्या गाण्यांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यानंतर आधीपासूनचं सर्वांचा लाडका असणारा अल्लू अर्जुन पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तुम्हाला माहिती आहे का, अल्लू अर्जुन, धनुष, महेश बाबू, थलापती विजय यांचे शिक्षण किती झाले आहे? कुणी आपले शिक्षण १२ वीनंतर अर्धवट सोडले तर काही स्टार्सनी बीबीए केलं आहे. जाणून घेऊया या स्टार्सच्या शिक्षणाविषयी- (South Star Education)
अल्लू अर्जुन
पुष्पा चित्रपटात चमकणारा अभिनेता अल्लू अर्जुनचे शालेय शिक्षण चेन्नईतील सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले. हैदराबादच्या एमएसआर कॉलेजमधून बीबीए केले आहे. त्यानंतर तो चित्रपटसृष्टीत आला.
धनुष
धनुष सुरूवातीच्या काळात फार शिक्षण घेतले नाही. त्याने चेन्नईतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलं. कमी वयात धुनषने चित्रपटात प्रवेश केला होता. तो अभिनय क्षेत्रात इतका रमला की, त्याने यामध्ये करिअर केलं. तो पुढे कॉलेजला गेल नाही. पण, मात्र डिस्टन्स लर्गिंगद्वारे धनुषने बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन) पूर्ण केले.
रजनीकांत
रजनीकांत यांचे प्राथमिक शिक्षण बंगळुरूमधील गविपुरम सरकारी कन्नड मॉडेलमधून झाले. यानंतर त्यांच्या भावाने त्यांना रामकृष्ण मठात शिक्षणासाठी पाठवले. तेथे वेद आणि इतिहासाचा अभ्यास केला. बस कंडक्टरची नोकरी करताना त्यांच्या एका मित्राने त्यांना अभिनयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा कोर्स केला आहे.
थलापती विजय
थलापती विजय हा साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पुढे त्याने चेन्नईच्या लोयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. पण, अभिनय क्षेत्रात आल्याने त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले.
विजय देवरकोंडा
विजय देवरकोंडा हा ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विजय देवरकोंडाने बी.कॉम केलं आहे.
महेश बाबू
महेश बाबूचे शालेय शिक्षण चेन्नईच्या सेंट बेडे अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी स्कूलमधून झाले. पुढे त्याने चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून पदवी घेतली. पण, अभिनेता होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याने अभिनयाचे ट्रेनिंग घेतले आणि अभिनय क्षेत्राकडे वळला.
सूर्या
जय भीम’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटात दिसलेल्या सूर्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
- अलका कुबल यांची मुलगी ईशानीचा थाटात लग्नसोहळा
- हवेली : राष्ट्रवादीला सहा महिन्यांत दोन जबर धक्के
- राजधानी दिल्लीत ‘कास’ असणार ‘खास’
View this post on Instagram
View this post on Instagram