‘जीव माझा गुंतला’ : अंतराला मिळणार मल्हारची साथ! | पुढारी

‘जीव माझा गुंतला’ : अंतराला मिळणार मल्हारची साथ!

पुढारी ऑनलाईन

कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेने सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले. परस्परविरोधी असे मल्हार आणि अंतरा लग्‍नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्‍नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही म्हणजेच अंतरा आणि मल्हारची कसोटी लागत आहे.

चित्राकाकी अंतराला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवण्याचा प्लॅन करताना दिसणार आहे. दुसरीकडे, मल्हारला काका आणि काकीच्या प्लॅनबद्दल कोणीतरी माहिती देणार आहेत. आता या सगळ्यामधून अंतरा कशी वाचणार? मल्हारची साथ अंतराला मिळणार का? अंतरावर मल्हार विश्‍वास ठेवणार का? मल्हार अंतराला यातून सुखरूप सोडवू शकेल की चित्राकाकीने रचलेल्या या सापळ्यात अंतरा अडकेल, हे बघणे रंजक ठरणार आहे.

कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली, सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अशा अंतरावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. मालिकेमध्ये येणार्‍या ट्विस्टमुळे पुढे काय होणार?

मल्हार आणि अंतराचे नाते कुठले नवे वळण घेणार? जाणून घेण्यासाठी बघत राहा ‘जीव माझा गुंतला’ दररोज रात्री 8.30 वा. कलर्स मराठीवर.

Back to top button