मौनी रॉय़ : ‘मूड मूड के ना देख मूड मूड के’, मौनीच्या लूकवर खिळल्या नजरा | पुढारी

मौनी रॉय़ : ‘मूड मूड के ना देख मूड मूड के’, मौनीच्या लूकवर खिळल्या नजरा

पुढारी ऑनलाईन

छोट्या पडद्यावरून सुरुवात करून आता बॉलीवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या चर्चेत आहे. तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियात ती नेहमीच सक्रिय असते.

इन्स्टाग्रामवर तिला 21 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्वतःचे फोटो ती शेअर करत असते. आताही अशाच एका हॉट अँड बोल्ड फोटोमुळे मौनीने सर्वांच्याच नजरा स्वतःकडे वळवून घेतल्या आहेत. हे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोतील गोल्डन ड्रेसमधील मौनीचा लूक घायाळ करणारा आहे. त्यामुळे अनेक नेटकर्‍यांची अवस्था ‘मूड मूड के ना देख मूड मूड के’अशी झाली. चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही तिच्या या फोटोवर कॉमेंट केल्या आहेत.

मौनीने ‘क्यों की सास भी कभी बहू थी’मधून टीव्हीवर पदार्पण केले होते. ‘नागीन’ मालिकेमुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली, तर त्यानंतर अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’मधून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. आगामी काळात ती आलिया भट्ट, रणबीर कपूरसोबत अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button