Rahul Gandhi: अमेरिकेत राहुल गांधींच्या भाषणावेळी खलिस्तान समर्थनार्थ घोषणा

Rahul Gandhi: अमेरिकेत राहुल गांधींच्या भाषणावेळी खलिस्तान समर्थनार्थ घोषणा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अआज त्‍यांनी कॅलिफोर्नियातील येथे त्यांनी आज (दि.३१) अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, भाषणादरम्यान एका ठिकाणाहून काही लोक खलिस्तान समर्थनार्थ घोषणा देताना दिसले. यावर राहुल गांधी यांनी 'भारत जोडो के नारे' आणि 'मोहब्बत की दुकान'च्या घोषणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांनी भारतीयांशी संवाद साधला. पण हा संवाद वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. नवीन संसद भवनावर टिप्पणी केल्यानंतर राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा परदेशी भूमीवर भारताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी फुटीरतावादी : विवेक अग्निहोत्री

राहुल गांधी भाषण करत होते, त्याचवेळी खलिस्तान समर्थनार्थच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. यावर राहुल गांधी हसताना दिसत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आता राहुल गांधी यांच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी तर राहुल गांधी यांचे फुटीरतावादी आणि शहरी नक्षल गटांचा नेता असे वर्णन केले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी हे आता सर्व फुटीरतावादी आणि नक्षलवादी गटांचे नेते म्हणून ओळखले जातात. लोक खलिस्तानच्या घोषणा देत आहेत आणि ते हसत असल्याचे त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुम्ही याचा अंदाज लावू शकता की याचा अर्थ काय आहे? येणारा काळ धोकादायक असू शकतो, असे ते म्हणाले.

भाजपचा आरोप

हा व्हिडिओ शेअर करताना भाजपचे अमित मालवीय यांनी लिहिले की, राहुल गांधी अमेरिकेत १९८४ च्या शीख नरसंहाराबद्दल बोलले. जे त्यांच्या सरकारनेच केले. त्यांनी पुढे लिहिले की, द्वेषाची अशी आग होती, जी आजपर्यंत विझलेली नाही.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news