BCCI Award : ‘बीसीसीआय’च्या पुरस्कारांची घोषणा! रोहित-विराट नाही तर ‘या’ खेळाडूने मारली बाजी

BCCI Award : ‘बीसीसीआय’च्या पुरस्कारांची घोषणा! रोहित-विराट नाही तर ‘या’ खेळाडूने मारली बाजी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Award : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चार वर्षांच्या कालावधीनंतर वार्षिक पुरस्कार जाहीर केले. बीसीसीआयने हैदराबाद येथे आयोजित एका विशेष समारंभात एकाच वेळी गेल्या चार वर्षांतील पुरस्कारांचे वितरण केले. माजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज फारूख इंजिनियर आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कर्नल सीके नायडू लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शुभमन गिलला 2022-23 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष) साठी पॉली उमरीगर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय मोहम्मद शमी (2019-20), आर अश्विन (2020-21) आणि जसप्रीत बुमराह (2021-22) यांची सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांना पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोहळ्यात टीम इंडियाचे सर्व स्टार खेळाडू सहभागी झाले होते.

गिलसाठी 2023 हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. या 12 महिन्यांत, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारा खेळाडू बनला. यादरम्यान त्याने वनडेत पाच शतकेही झळकावली. गेल्या वर्षी त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकी खेळी साकारल्या.

हैदराबादमध्ये येथे गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या सोहळ्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम हेही उपस्थित होते. बीसीसीआय पुरस्कार 2019 नंतर प्रथमच देण्यात आले आहेत. स्मृती मानधना 2020-21 आणि 2021-2022 ची सर्वोत्तम महिला क्रिकेटर ठरली. अष्टपैलू दीप्ती शर्मा हिला 2019-20 साठी सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.

भारताचे माजी फलंदाज फारुख इंजिनियर (वय 85) यांनी भारतासाठी 46 कसोटीत 2611 धावा तर 5 वनडेत 114 धावा केल्या. 1961 ते 1975 या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय होते. रवी शास्त्री यांनी 1981 ते 1992 या काळात 80 कसोटी (3830 धावा) आणि 150 एकदिवसीय सामने (3108 धावा) खेळले. 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे ते भाग होते. निवृत्तीनंतर शास्त्रींनी समालोचक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

BCCI पुरस्कार विजेत्यांची यादी

मोहम्मद शमी : 2019-20 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष)
रविचंद्रन अश्विन : 2020-21 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष)
जसप्रीत बुमराह : 2021-22 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष)
शुभमन गिल : 2022-23 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष)

दीप्ती शर्मा : 2019-20 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला)
स्मृती मानधना : 2020-22 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला)
दीप्ती शर्मा : 2022-23 सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला)

पूनम यादव : 2019-20 सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स (महिला)
झुलन गोस्वामी : 2020-21 सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स (महिला)
राजेश्वरी गायकवाड : 2021-22 सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स (महिला)
देविका वैद्य : 2022-23 सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स (महिला)

पूनम राऊत : 2019-20 सर्वाधिक एकदिवसीय धावा (महिला)
मिताली राज : 2020-21 सर्वाधिक एकदिवसीय धावा (महिला)
हरमनप्रीत कौर : 2021-22 सर्वाधिक एकदिवसीय धावा (महिला)
जेमिमाह रॉड्रिग्ज : 2022-23 सर्वाधिक एकदिवसीय धावा (महिला)

जयदेव उनाडकट : 2019-20 रणजी करंडक सर्वाधिक विकेट्स (माधवराव सिंधिया पुरस्कार)
शम्स मुलाणी : 2021-22 रणजी करंडक सर्वाधिक विकेट्स (माधवराव सिंधिया पुरस्कार)
जलज सक्सेना : 2022-23 रणजी करंडक सर्वाधिक विकेट्स (माधवराव सिंधिया पुरस्कार)

राहुल दलाल : 2019-20 रणजी करंडक सर्वाधिक धावा (माधवराव सिंधिया पुरस्कार)
सरफराज खान : 2021-22 रणजी करंडक सर्वाधिक धावा (माधवराव सिंधिया पुरस्कार)
मयंक अग्रवाल : 2022-23 रणजी करंडक सर्वाधिक धावा (माधवराव सिंधिया पुरस्कार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news