

पुढारी ऑनलाईन डेस्क – एक सुंदर अभिनेत्री असण्याबरोबर श्रद्धा कपूर उत्तम गातेदेखील, (Shraddha Kapoor Video) ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झालीय. तिचा गाणे गातानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Shraddha Kapoor Video)
संबंधित बातम्या –
श्रद्धा कपूरने नुकताच मुंबईतील मराठी नवरात्री महोत्सवात हजेरी लावली. ती कार्यक्रमात दाखल होता, हजारोंच्या संख्येने जमलेल्या प्रेक्षक-चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी तिने स्टेजवर आशिकी २ मधील चाहू मैं या ना या गाण्याचे बोल गायिले. तिने गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ नेटवर व्हायरल होत आहे. आशिकी २ या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता. बेबी पिंक लेहेंगा चोली, खूप कमी ज्वेलरी, केसांची पोनी टेल आणि कानात झुमके असा तिचा लूक उठावदार दिसत होता. तिच्या सुंदर आवाजाने सर्वच जण भारावून गेले. गाणे संपल्यानंतर तिने हात जोडून सर्वांना अभिवादन देखील केले.
याआधी तिला आपण बाघी चित्रपटातील सब तेरा हे गाणे गाताना पाहिले आहे. बाघीमध्ये तिच्यासोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता.
दरम्यान, तिने लेहेंगा चोलीतील काही फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने इन्स्टावर कॅप्शनमध्ये म्हटलंय -Dussehra hai, dus mithaiyan toh khaani banti hain na??? ??
Video – ????? एक्स वरून साभार