Dasara Special : दसरा आणि सनी लिओनी-अंकिता लोखंडेची साडी स्टाईल | पुढारी

Dasara Special : दसरा आणि सनी लिओनी-अंकिता लोखंडेची साडी स्टाईल

पुढारी ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सनी लिओनी ही कोणत्याही पोशाखात ग्रेस आणि ग्लॅमरस दिसते. (Dasara Special) पटियाला सूटपासून ते एका सुंदर गाऊनपर्यंत कॅज्युअल ट्रेंडी ट्रॅक सूटपासून ते साडीसारख्या पारंपरिक गोष्टीपर्यंत सनीने नेहमीच तिचा फॅशन गेम ऑन ठेवला आहे. या दसऱ्याच्या निमित्ताने तिच्या साड्याची ही खास गोष्ट. (Dasara Special)

संबंधित बातम्या –

सनी लिओनी तिच्या हिरवी रंगाची साटीन साडीत अगदीच उठावदार दिसतेय आणि या लूकमध्ये ती अगदीच सहजतेने सुंदर दिसते. मोहक कासवू साडी परिधान केलेल्या सनीने चॅरिटी गालामध्ये एकदम कमाल केली.

क्लासिक सोन्याचे झुमके आणि सुशोभित सोन्याच्या बांगड्यांमुळे तिचा शाही लूक दिसत होता. सनी लिओनीची सिल्व्हर बॉर्डर, स्लिट आणि मॅचिंग स्ट्रॅप ब्लाउज असलेली काळी साडी दसरासाठी एकदम शोभून दिसत होती.

अंकिता लोखंडेचे एथनिक लूक्स

या दसऱ्याला अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन या प्रेमळ जोडप्याच्या खास एथनिक लूक बद्दल जाणून घेऊ या. बेबी पिंक अंकिता लोखंडे एका भव्य सिल्क साडीमध्ये बेबी पिंकचा टच असलेल्या साडीमध्ये पारंपरिक दागिन्यांसह सुंदर दिसतेय.

सोनेरी साडीत आणि हलक्या मेकअपच्या लुकमध्ये अंकिता चमकत आहे.

ब्लू अफेअर्स अंकिता लोखंडे ही तिच्या साड्यांच्या प्रेमासाठी ओळखली जाते आणि तिने आपल्या वॉर्डरोबमध्ये या साड्यांचे कलेक्शन केले आहे. सोनेरी प्रिंट असलेली ही निळी साडी कमाली आहे.

ब्लॅक इस न्यू ब्लॅक अंकिताने ही काळी साडी जड दागिन्यांसह पेअर केली आहे आणि सणासुदीच्या काळात तुम्ही अशी फॅशन नक्की करू शकता.

 

Back to top button