

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिक्षातून प्रवास करत श्रद्धाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. खरंतरं शूटिंगला पोहोचण्यासाठी श्रद्धा कपूर रिक्शा से रिक्षाने जाताना दिसली. यावेळी श्रद्धाला पाहण्य़ासाठी लोकांनी गर्दी केली. नो मेकअप लूकमध्ये श्रद्धा (Shraddha Kapoor) वर्सोवामध्ये दिसली. एका ब्रँडच्या शूटसाठी ती रिक्षातून वर्सोवा जेट्टी आली होती. यावेळी ती विना मेकअपदेखील सुंदर दिसत होती. (Shraddha Kapoor) यावेळी तिने मास्क लावला होता. पॅपराझींच्या म्हणण्यावर तिने मास्क काढला आणि पोझदेखील दिली. यावेळी तिने लाईट ग्रीन टी-शर्ट आणि ब्लू जीन्स परिधान केले होते.
संबंधित बातम्या –
यावेळी ती मीडिया पर्सनशी मराठीमध्ये बोलत होती. यावेळचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आङे. या व्हिडिओमध्ये ती मराठीमध्ये म्हणताना दिसते की, तुम्ही रिव्हर्स चालला आहात, पण मला भीती वाटतेय…सांभाळून.
श्रद्धाचे शॉर्ट स्लिव्हलेस ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले आहेत. पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये श्रद्धाचा सुपर लूक दिसत आहे.
सोशल मीडियावर श्रद्धा कपूर खूप ॲक्टिव्ह राहते. बुधवारी श्रद्धा कपूरने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटो शेअर केले. तिचे फोटो पाहून फॅन्स घायाळ झाले. फोटोमध्ये श्रद्धा कपूर खूप क्यूट दिसत आहे. एका फॅनने या फोटोवर कॉमेंट करून लग्नावरून प्रश्न विचारला. त्याने लिहिलं की-"लग्न कधी करशील?" पण या कॉमेंटवर श्रद्धाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
दरम्यान, रणबीर कपूरसोबत ती 'तू झूठी मैं मक्कार' मध्ये दिसली होती.