

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील रेड रिव्हर एरियामध्ये बाईक रॅलेवर माथेफिरुने अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जण ठार झाले असून पाच जण गंभीररित्या जखमी झाला आहे. मेक्सिको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रेड रिव्हर मोटारसायकल रॅली'दरम्यान हा प्रकार घडला. जखमींना डेनेवर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Shooting at New Mexico)
न्यू मेक्सिको स्टेट पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, रेड रिव्हर भागात शनिवारी ( दि. २७) मोटारसायकल रॅलीत झालेल्या गोळीबारात तीन जण ठार आणि पाच जण गंभीर जखमी झाले
न्यू मेक्सिको राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड रिव्हर मोटारसायकल रॅलीमध्ये शहराच्या मुख्य रस्त्यावर हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी बायकर गँगने अंदाधूंद गाेळीबार केला. जखमींना ताओसमधील होली क्रॉस हॉस्पिटल आणि अल्बुकर्कमधील न्यू मेक्सिको हेल्थ विद्यापीठात दाखल करण्यात आले आहे. (Shooting at New Mexico)