Latest
कल्याणचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार
ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (दि.२) रात्री उल्हासनगर येथे गोळीबार झाला. जखमी गायकवाड यांना ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यामुळे रूग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही रुग्णालयाला भेट दिली. कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेत नेहमीच तणावाचे वातावरण असते. या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :

