Sukhee Movie :तारीख ठरली! शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’चा ट्रेलर या दिवशी येणार

shilpa shetty
shilpa shetty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिल्पा शेट्टी कुंद्राच्या (Sukhee Movie) आगामी चित्रपट "सुखी"चा बहुप्रतीक्षित ट्रेलर ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. (Sukhee Movie) शिल्पाचे चाहते यासाठी उत्सुक आहेत. शिल्पा तिच्या अष्टपैलुत्वासाठी आणि मनमोहक प्रतिभेसाठी ओळखली जाते. तिच्या "सुखी" मधील अभिनयाने तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ट्रेलर रिलीजच्या बातमीने आता सगळ्यांना ट्रेलरची उत्सुकता लागली आहे.

अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी कुंद्राची उत्क्रांती अफलातून आहे. तिच्या आगामी चित्रपट "सुखी"साठी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. ६ सप्टेंबरला ट्रेलर रिलीज होण्यासाठी शिल्पाचे फॅन्स वाट बघत आहेत.

चित्रपटाची कथा आणि कलाकारांची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा वाढवत आहे. चाहते तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. "सुखी" एक अत्यंत अपेक्षित सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अफलातून प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news