शिखर धवन रोहित, विराटला टाकले मागे टाकत ठरला ‘आयपीएल किंग’

शिखर धवन रोहित, विराटला टाकले मागे टाकत ठरला ‘आयपीएल किंग’
Published on
Updated on

आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्सचा ८ विकेट्सनी पराभव केला. या विजयाबरोबरच दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात दिल्लीकडून शिखर धवन, श्रेयस अय्यर, पंत, नॉर्खिया आणि रबाडा या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. शिखर धवनने फलंदाजी करताना रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. धवनने नवे रेकॉर्ड स्थापन करत टी २० मधील किंग म्हणून गणल्या जाणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्मालाही मागे टाकले.

दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला १३४ धावांवर रोखले. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज नॉर्खियाने भेदक मारा करत हैदराबादला सुरुवातीलाच धक्के दिले. त्यानंतर रबाडा आणि अक्षर पटेल यांनी दिल्लीची मधली फळी उद्ध्वस्त केली. रबाडाने ३७ धावात ३ तर नॉर्खियाने १२ धावात २ विकेट घेतल्या. या दोघांना अक्षर पटेलने २१ धावात २ विकेट घेत चांगली साथ दिली.

दिल्लीच्या विजयाचा पाया रचणारा शिखर धवन

त्यानंतर हैदराबादचे १३५ धावांचे आव्हान पार करताना दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने दमदार सुरुवात केली. त्याने ४२ धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ४७ धावांची नाबाद खेळी केली. त्याला कर्णधार ऋषभ पंतने ३१ चेंडूत ३५ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली.

शिखर धवनने आपल्या या ४२ धावांच्या खेळीने एका विशेष विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलच्या १४ व्या हंगामात शिखर धवनने ९ सामन्यात आतापर्यंत ४२२ धावा केल्या आहेत. याचबरोबर तो सलग सहा हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यापूर्वी सुरेश रैना आणि डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या सलग सात हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे.

विराट, रोहितला मागे सारत धवन शिखरावर

याचबरोबर शिखर धवन आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात ८ हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने या यादीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकले. या तिघांनीही प्रत्येकी ७ हंगामात ४०० च्या वर धावा केल्या होत्या.

शिखर धवन अजून एका विक्रमाच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे आहे. शिखर धवन आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार मारणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ६४० चौकार मारले आहेत. तर या यादीत दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने आतापर्यंत ५२५ चौकार मारले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news