पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्वीट करून याची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राजकीय तसेच अन्य सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी ट्विट करून हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर जगभरातून मातोश्री हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्यासह नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड, इस्त्राईलचे राजदूत डॅनियल कार्मोन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंना श्रद्धांजली वाहिली आहे.