Share Market Today | कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स २३० अंकांनी घसरून ६१,७५० वर बंद

Share Market Today | कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स २३० अंकांनी घसरून ६१,७५० वर बंद
Published on
Updated on

Share Market Today : कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी घसरण दिसून आली. सेन्सेक्स २३० अंकांनी घसरून ६१,७५० वर बंद झाला. तर निफ्टी ६५ अंकांनी घसरून १८,३४३ वर आला. बीएसईवर १,५१८ शेअर्स वाढले तर १,९९१ घसरले. दरम्यान, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (m-cap) २८३.१४ लाख कोटी रुपयांवर आले आहे.

निफ्टीवर टायटनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पहायला मिळाली. हा शेअर २.२८ टक्क्यांनी घसरून २,५८३ वर बंद झाला. M&M, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स घसरले. टाटा ग्राहक उत्पादने (Tata Consumer Products), अदानी एंटरप्रायझेस, एल अँड टी, पॉवरग्रीड आणि एचडीएफसी लाइफ या कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर होते.

आज सकाळी बाजार खुला होताच सेन्सेक्स सुमारे १२५ अंकांनी घसरून ६१,८०० वर होता. तर निफ्टीही किचिंत घसरुन १८,३०० वर होता. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत ही घसरण कायम राहिली. अमेरिकेतील शेअर बाजारातील घसरणीमुळे आशियाई शेअर्सही घसरले. अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांक खाली आले आहेत.

जपानचा निक्केई निर्देशांक ०.४० टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा KOSPI १.२२ टक्क्यांनी खाली आला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.६७ टक्क्यांनी घसरला आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक २.३३ टक्क्यांनी खाली आला. याचे पडसाद गुरुवारी भारतीय शेअर बाजारात उमटले.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग दुसऱ्या सत्रात शेअर्सची विक्री केली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, एफआयआयनी ३८६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,४३७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

बीएसई सेन्सेक्स बुधवारी १०८ अंक म्हणजेच ०.१७ टक्क्यांनी वाढून ६१,९८१ वर बंद झाला होता. तर निफ्टी १८,४१० वर जाऊन स्थिरावला होता. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सेन्सेक्सने ६२,२४५ अंकांची पातळी गाठली होती. आता सेन्सेक्स ३०० अंकाहून कमी अंतरावर आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढवली आहे. यामुळे बुधवारी सेन्सेक्स वाढल्याचे दिसून आले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news