Share Market Today | सेन्सेक्स २७४ अंकांनी ‍वाढून ६१,४१९ वर बंद, पेटीएमचा शेअर ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर

Share Market Today | सेन्सेक्स २७४ अंकांनी ‍वाढून ६१,४१९ वर बंद, पेटीएमचा शेअर ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर
Published on
Updated on

Share Market Today : कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. तसेच आशियाई बाजारातून संमिश्र संकेत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज मंगळवारी (दि.२२) सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतार दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५५ अंकांनी खाली येऊन ६१ हजारांवर होता. तर निफ्टी १८,१०० वर व्यवहार करत होता. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीवर घसरण थांबून दोन्ही निर्देशांक ‍वधारले. सेन्सेक्स २७४ अंकांच्या वाढीसह ६१,४१९ वर बंद झाला. तर निफ्टी ८४ अंकांनी वाढून १८,२४४ वर बंद झाला. युको बँकेचा शेअर्स सर्वाधिक १२ टक्क्यांनी वधारला. तर पेटीएमचा शेअर ११ टक्क्यांनी घसरून ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला. इंडसइंड बँकेचा शेअर २.९३ टक्क्यांनी वाढून १,१७२.४० रुपयांवर बंद झाला. एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी लाइफ आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचेही शेअर्स वधारले.

बीएसईवर १,४०० शेअर्स वाढताना दिसले तर ९७७ शेअर्समध्ये घसरण झाली. एल अँड टी, इंडसइंड बँक, एनटीपीसी, मारुती आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स NSE प्लॅटफॉर्मवर आज ०.६४ टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी १,५९४ कोटी शेअर्सची विक्री केली. तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,२६३ कोटी शेअर्सची खरेदी केली. दरम्यान, जपानचा निक्केई निर्देशांक ०.७४ टक्क्यांनी वाढला. दक्षिण कोरियाचा KOSPI ०.२५ टक्क्यांनी घसरला. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.०९ टक्क्यांनी वाढला आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.८ टक्क्यांनी घसरला. तर अमेरिकेतील तीन प्रमुख निर्देशांक घसरले आहेत. (Share Market Today)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news