

पुढारी ऑनलाईन डेस्क : आठवडयाच्या दुसर्या दिवशी आज ( दि. १७) शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. बीएसई सेन्सेक्स २५१.८६ अंकांनी वाढून ६०, ३४४.८३ अंकांवर उघडला. तर निफ्टी ६५.५५ अंकांनी घसरुन १७,९६० अंकांवर व्यवहार करत होता.
सोमवारी रात्री उशिरा केंद्र सरकारने तेलावरील विंडफॉल टॅक्स २,१०० रुपये प्रति टन वरून १,९०० रुपये ($23.28) प्रति टन केले. ही करकपात आजपासून लागू होणार आहे. या करकपातीचे सकारात्मक परिणाम बाजारावर झाले. आज सुरुवातीच्या व्यवहारात रिलायन्सची बाजाराला साथ मिळाल्याचे दिसले. केंद्र सरकारने कर कपात केल्याने रिलायन्स, ओएनजीसी, गेल यांसारख्या तेल कंपन्यांचे शेअर्स वधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा :