Share Market closing | शेअर बाजार पुन्हा अस्थिर! सेन्सेक्स ३११ अंकांनी घसरून बंद, वाचा मार्केटमध्ये आज काय घडलं?

Share Market closing | शेअर बाजार पुन्हा अस्थिर! सेन्सेक्स ३११ अंकांनी घसरून बंद, वाचा मार्केटमध्ये आज काय घडलं?
Published on
Updated on

Share Market closing : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आज सोमवारी (दि.२०) शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ कामय ठेवण्याची शक्यता आणि उत्तर कोरियाकडून डागण्यात येत असलेली क्षेपणास्त्र यामुळे जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराचा मूड बिघडल्याचे दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टीने आज तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० अंकांनी वाढला. तर निफ्टी १८ हजारांजवळ होता. त्यानंतर दुपारच्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीने तेजी गमावली आणि काही वेळ स्थिर पातळीवर राहिल्यानंतर त्यांची घसरण झाली. दुपारी २ वाजता सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी घसरून ६०,६८७ वर होता. तर निफ्टी १७,९०० च्या खाली गेला होता. त्यानंतर सेन्सेक्स ३११ अंकांच्या घसरणीसह ६०,६९१ वर बंद झाला. तर निफ्टी ९९ अंकांनी खाली येऊन १७,८४४ वर स्थिरावला.

आयटी स्टॉक्स आघाडीवर

क्षेत्रीय निर्देशांकांत आयटी स्टॉक्स आघाडीवर राहिले. सेन्सेक्सवर आज अल्ट्राटेक सिमेंट (१.८५ टक्के), टेक महिंद्रा (१.२० टक्के), पॉवर ग्रिड (०.८७ टक्के), टाटा मोटर्स (०.८४ टक्के), एम अँड एम (०.६४ टक्के) हे शेअर्स वाढले. तर एबीआय (-१.११ टक्के), ॲक्सिस बँक (-१.०६ टक्के), टायटन (-१.०८ टक्के), कोटक महिंद्रा (-१.२३ टक्के), एचडीएफसी (-१.३९ टक्के) हे शेअर्स घसरले. आज सुमारे १,२८९ शेअर्स वाढले, तर २०२९ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १४२ शेअर्समध्ये काही बदल दिसून आला नाही. २०२२ मध्ये आयटी शेअर्सची कामगिरी खराब राहिली होती. पण २०२३ मध्ये आतापर्यंत निफ्टी आयटी ८.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. निफ्टी आयटीमध्ये १० मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे.

आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक हे बँकिंग स्टॉक्समध्ये आज घसरण झाली.

सिप्लाचा शेअर निचांकी पातळीवर

१३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी सहा घसरले आणि फार्मा निर्देशांक सुमारे १ टक्के घसरला. सिप्ला हा फार्मामधील दुसऱ्या क्रमांकाचा मजबूत असलेला शेअर सुमारे ७ टक्क्यांने घसरून सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला. हा शेअर निफ्टी ५० वरील टॉप लूजर होता.

अदानी समूहातील शेअर्सचा संमिश्र व्यवहार

दरम्यान, आजच्या व्यवहारात अदानी समूहातील शेअर्स संमिश्र व्यवहार करताना दिसले. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ४.११ टक्क्याने खाली आला. तर अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. (Share Market closing)

NSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी ६२४.६१ कोटी रुपयांचे शेअर्स तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ८५.२९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. या महिन्यात १७ फेब्रुवारीपर्यंत FII ने १,४०८.३६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर DII ने ९,१८८.१५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news