Sharad Pawar : थोरले पवार दाखवणार आता पुण्यात ‘पॉवर’; या दिवशी करणार रोड शो

Sharad Pawar : थोरले पवार दाखवणार आता पुण्यात ‘पॉवर’; या दिवशी करणार रोड शो

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात रोड शो केला. त्यानंतर आता शरद पवार यांचा रोड शो आणि सभा होणार असल्याची माहिती शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार असून, त्यात या रोड शो आणि सभेचे पुढील नियोजन केले जाणार असून, 27 किंवा 29 ऑक्टोंबर रोजी गणेश कला क्रीडा या सभागृहात शरद पवारांची सभा होणार आहे.

संबंधित बातम्या : 

काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामती आणि पुण्यात दोन ठिकाणी रोड शो केला होता. त्यावेळी हजारोंनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले होते. ढोल ताशा आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साहात अजित पवारांचा रोड शो पार पडला होता. त्यामुळे आता शरद पवार या रोडशो च्या माध्यमातून पक्षबांधणीचा संदेश देतात कि अजित पवारांवर टीकास्त्र सोडणार हे लवकरच समजेल .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news