येवल्यात शरद पवारांची आज सभा तर नाशिकमध्ये भुजबळांचे शक्तीप्रदर्शन

येवल्यात शरद पवारांची आज सभा तर नाशिकमध्ये भुजबळांचे शक्तीप्रदर्शन

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कॅबिनेट मंत्री मंडळात शपथ ग्रहण केल्यानंतर छगन भुजबळ आज नाशिक जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भुजबळ समर्थकांकडून करण्यात आली आहे. तर एकीकडे शरद पवार हे छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवल्यात सभा घेणार असल्याने येवल्यात पवार व नाशिकमध्ये भुजबळ असा सामना आज पाहायला मिळणार आहे. छगन भुजबळ हे देखील नाशिकमध्ये भव्य शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांची निवड झाल्यानंतर नाशिक पुण्यनगरीत आज त्यांचे आगमन होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भुजबळांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

छगन भुजबळ हे नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथे दुपारी २ वाजता येणार असून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहे. यानंतर भुजबळ फार्म येथे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांची भेट घेणार असल्याने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान शरद पवार यांच्या भाषणाला छगन भुजबळ देखील प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज चांगलेच राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news