Shah Rukh Khan Jawan | ‘पठाण’नंतर शाहरुखच्या ‘जवान’चा धमाका, ओपनिंगला छप्परफाड कमाई

Shah Rukh Khan Jawan
Shah Rukh Khan Jawan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा बहुचर्चित जवान चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झाला. शाहरुखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हा चित्रपट ब्लॉकबास्टर असल्याचे म्हटले आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आज जवान पाहण्यासाठी पहाटेपासूनच चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली. शाहरुख खानचा जवान चित्रपट 'पठाण' पेक्षाही मोठा हिट ठरेल अशी शक्यता चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केली आहे. चित्रपट समीक्षकांनी याला ४.५ स्टार्स दिले आहेत. (Shah Rukh Khan Jawan)

दरम्यान, चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर आज दुपारी १२ पर्यंतचे जवान चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे जाहीर केले आहेत. १२ वाजेपर्यंत जवानचे तिकीट कलेक्शन १९.३५ कोटी रुपये झाले आहे. पठाणने पहिल्या दिवशी २७.०२ कोटी, केजीएफ २ (हिंदी) २२.१५ कोटी, वार १९.६७ कोटी रुपये होते. दिवसभराचे कलेक्शन समोर आल्यानंतर नेमका आकडा कळणार आहे.

'जवान'मध्ये शाहरुख खान दुहेरी भूमिकेत असून नयनतारा, विजय सेतुपती, गिरीजा ओक यांच्याही भूमिका आहेत. काही चाहत्यांनी चित्रपट पाहून जवानचे काही सीन सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, काही चाहत्यांनी या सीनची झलक दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

शाहरुख खान पठाण नंतर पुन्हा द्विशतक ठोकेल. यावेळी खूप भव्य अवतारात आलेला जवान SRK च्या टॉप 5 भव्य चित्रपटांमध्ये असेल. लेडी सुपरस्टार नयनतारा ही हिंदी पट्ट्यातील नवीन क्रश आहे. ती एक दमदार अभिनेत्री असून तिने जबरदस्त भूमिका साकारली आहे. विजय सेतुपतीचीही भूमिका चांगली आहे. असाधारण अॅक्शन सिक्वेन्स आणि दोन बादशाह असलेला हा चित्रपट देशात बॉक्स ऑफिसवर (हिंदी) ५०० कोटींची कमाई करेल, असे चित्रपट समीक्षक रोहित जैस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले आहे. (Jawan movie review and release)

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, जवान चित्रपट रिलीज होण्याआधीच बुधवारपर्यंत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ५ लाख ५७ हजार तिकीटे विकली गेली होती.

रिलीजपूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे ५१.१७ कोटींचा गल्ला जमवला आहे. यामुळे पहिल्या दिवशीच या चित्रपटाचे कलेक्शन ८० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवान हिंदी शिवाय तमिळ, तेलुगूमध्येही रिलीज झाली आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाईचे रेकॉर्ड शाहरुखच्या पठाणच्या नावावर आहे. 'पठाण'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ५७ कोटींचा गल्ला जमवला होता. सध्या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता जवान पहिल्या आठवड्याच २५० कोटींची कमाई करु शकतो, असे चित्रपट विश्लेषकांचे म्हणणे आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते गाण्यांपर्यंत सगळंच अप्रतिम आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता लक्षात घेत आज ७ सप्टेंबरपासून चित्रपटाचे शो पहाटे आणि रात्री उशिराही ठेवण्यात आले आहेत. जवान चित्रपटाचा पहिला शो ७ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे पहाटे ५ वाजता ठेवण्यात आला होता. याशिवाय बंगालमधील रायगंज येथे ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २.१५ वाजता चित्रपटाचा पहिला शो ठेवण्यात आला आहे. दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये सकाळी ७ वाजता चित्रपटाचा पहिला शो सुरू होत आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news