खासगी बसेस जळून खाक
खासगी बसेस जळून खाक

लातुरात शॉर्ट सर्किटच्या आगीत सात खासगी बसेस जळून खाक

Published on

लातूर ; पुढारी वत्‍तसेवा  शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लातूर शहरातील एका गॅरेजमधील सात खासगी बसेस जळून खाक झाल्या. या आगीमध्ये सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवार रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवर ही घटना घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, विजेची तार तुटून शॉर्टसर्किट झाले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोजंम गुंडे पेट्रोलपंपा नजीक असलेल्या गॅरेजवर वीजेची तार तुटून पडली. या गॅरेजवर पत्रे नसल्‍याने ही वायर बसवर पडली. त्‍यात शॉर्टसर्किट होऊन या ठिकाणी उभ्‍या असलेल्‍या बसना आग लागली. यावेळी लागलेल्‍या या भीषण आगीमुळे मोठ्या स्‍फोटाचा आवाज झाला. त्यामुळे तिथे जाण्याचे धाडस कोणी केले नाही. यानंतर अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. तब्बल चार तास शर्तीचे प्रयत्न करून ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.

अग्‍निशमन दलाचे चार बंब व दहा जवान पहाटेपर्यंत आग विझवत होते. या आगीत या ठिकाणच्या सर्व बस गाड्यांचा कोळसा झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे जवान अनिकेत येरोळकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news