सिक्रेट ऑफ गावस्कर : या क्राईम वेब सीरीजमध्ये दिसणार तगडे कलाकार

secrets of gavaskar
secrets of gavaskar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ वेगाने पसरत आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकार ही ओटीटी विश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ॲक्शन, वजनदार कथानक घेऊन येत आहे. उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रीलरचा कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' येत आहे. ही नवीकोरी वेब सीरीज एकापेक्षा एक कलाकारांना घेऊन येत आहे.

अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिका या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत.
'चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट' निर्मित आणि 'व्हीमास मराठी' प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस लोखंडे आहेत. याआधी व्हीमास मराठीच्या 'राडा राडा' या टॉक शोमधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकली होती. त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

लेखक अजिंक्य ठाकूर लिखित ही वेब सीरीज असून याच्या संकलनाची बाजू प्राची पाठारे हिने उत्तमरीत्या साकारली आहे. तर क्राईम सीनला कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी शिवराज सातार्डेकर याने पेलली आहे.

या वेब सीरीजबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणाला की, 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेब सीरीज वेगळ्या पठडीतील असून प्रत्येक कलाकाराने केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. या वेब सीरीजमध्ये काम केलेलं सर्वच कलाकार माझे मित्र आहेत. साऱ्या कलाकारांचा अभिनयाचा अनुभव दांडगा असल्याने साऱ्यांनीच वेब सीरीजमध्ये उत्तम काम केलं आहे. या वेबसिरीजची कथा प्रत्येक पाचव्या मिनिटाला आपल्याला संभ्रमात पाडतेय, त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता आणखी ताणली जातेय. या वेब सीरीजमुळे आम्ही एक वेगळा जॉनर प्रेक्षकांसमोर आणला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news