

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर्मनीच्या मार्टिन लूथर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी डासांपासून बचाव करण्यासाठी विशेष 3D प्रिंटेड अंगठी तयार केली आहे. ही अंगठी घातल्यानंतर डास आणि लहान कीटक बराच वेळ दूर राहतात. यासाठी अंगठीच्या प्रोटोटाईपमध्ये डासांना दूर पळविणारे 'आईआर-३५३५' चा वापर केला असल्याचे युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एंद्रोस्च यांनी सांगितले.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये डासांपासून बचाव करण्यासाठी विशेष 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. मार्टिन ल्यूथर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानावर आधारीत अंगठी तयार केली आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या डासविरोधी स्रावामुळे डास किंवा किटक जवळ येत नाहीत. शिवाय यामुळे त्वचेलाही कोणती हानी पोहचत नाही. डासांपासून बचाव करण्यासाठी सुरुवातीपासूनच वैज्ञानिकांच्या टीमचा अंगठी किंवा ब्रेसलेट सारखी वस्तू विकसित करण्यावर भर होता, असेही या टीमने म्हटले आहे.
अनेक प्रयोगांनंतर, या टीमने असा अंदाज लावला आहे की, शरीराच्या ३७ डिग्री सेल्सिअस तापमानात अंगठीमधील डासविरोधी द्रवपदार्थ नष्ट होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागेल. त्यामुळे ही अंगठी किमान एक आठवडाभर वापरता येणार आहे.
हेही वाचा :