SBI Recruitment : एसबीआय मध्ये मेगाभरती, लिपिक पदासाठी ८,२३८ जागा

SBI Recruitment : एसबीआय मध्ये मेगाभरती, लिपिक पदासाठी ८,२३८ जागा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये  लिपिक पदासाठी मेगाभरती सुरू आहे. लिपिक संवर्गातील ८ हजार २३८ कनिष्ठ सहयोगी पदांसाठी 'एसबीआय'कडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांची पूर्वपरीक्षा जानेवारी २०२४ मध्ये, तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे.  (SBI Recruitment)

लिपिकच्या ८,२३८ पदांपैकी ३,५१५ पदे सर्वसाधारण, १२८४ अनुसूचित जाती, ७४८ अनुसूचित जमाती, १९१९ ओबीसी, ८१७ इडब्ल्यूएस पदे राखीव आहेत. उमेदवारांना केवळ एका राज्यासाठी अर्ज करता येणार आहे. लिपिक भरतीसाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण अशी शैक्षणिक अर्हता आहे. तसेच, जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत त्यांनादेखील अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (SBI Recruitment)

राज्यनिहाय जागा  (SBI Recruitment)

उत्तर प्रदेश- १७८१,

राजस्थान- ९४०,

गुजरात- ८२०,

तेलंगणा- ५२५,

बिहार- ४१५,

मध्य प्रदेश- २८८,

हरियाणा- २६७,

छत्तीसगड- २१२,

हिमाचल प्रदेश- १८०,

झारखंड-165

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news