Saawan Kumar : ‘सौतन’, ‘सनम बेवफा’चे दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन

Saawan Kumar : ‘सौतन’, ‘सनम बेवफा’चे दिग्दर्शक सावन कुमार यांचे निधन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा 'सौतन' आणि सलमान खानला सुरुवातीच्या काळात ओळख मिळवून देणारा 'सनम बेवफा' सारखे चित्रपट बनविणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक, गीतकार सावन कुमार (Saawan Kumar) यांचे मुंबईत गुरुवारी (दि.२५) निधन झाले. सावन कुमार यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे मुंबई येथील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सावन कुमार (Saawan Kumar) यांना फुफ्फुसातील संसर्ग व श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना किडनीसंदर्भातील आजार जडला होता. गुरुवारी सकाळी त्यांची तब्बेत अधिकच बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ते गंभीररित्या आजारी होते, त्यांचे फुफ्फुस व श्वसन यंत्रणांनी काम करणे बंद केले होते. याचा परिणाम ह्रदयारवर देखिल पडला होता. गुरुवारी सुमारे ४ च्या सुमारास ह्रदयाच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

1936 साली जन्मलेले सावन कुमार (Saawan Kumar) यांनी पटकथा लेखक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९६७ साली आलेल्या 'नौनिहाल' या चित्रपटाचे लेखन त्यांनी केले. या चित्रपटात मुख्य अभिनेते संजिव कुमार हे होते. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढे त्यांनी यांनी १९७२ साली 'गोमती के किनारे' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. यांच्या चित्रपटांमुळे अभिनेते संजीव कुमार आणि विनोदी अभिनेते ज्युनियर मेहमुद यांना ओळख मिळाली. यानंतर त्यांनी राजेश खन्ना, पद्मिनी कोल्हापुरे आणि टीना मुनिम यांना घेऊन बनविलेला 'सौतन' (१९८३) हा सिनेमा खूपच गाजला होता. या चित्रपटामुळे राजेश खन्ना यांच्या संकटात सापडलेल्या करिअरला नवसंजीवनी मिळाली होती.

यासह 'सनम बेवफा'(१९९१), चाँद का तुकडा (१९९४), दिल परदेसी हो गया (२००३), सावन (२००६) यासह त्यांनी तब्बल २१ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर १४ चित्रपटांचे पटकथा लेखन केले. याशिवाय तब्बल १८ चित्रपटांची गीते त्यांनी लिहली आहेत. 'जिंदगी प्यार का गीत है', 'चुडी मजा ना देगी' सारखी सुपरहीट गीते त्यांनी लिहली. ह्रतिक रोशनचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' मधील 'जानेमन जानेमन', 'प्यार की कश्ती में', 'चांद सितारे' ही गीते त्यांनी लिहली होती. यामुळेच 'कहो ना प्यार है' हा चित्रपट एक म्युझिकल हिट मानला जातो.

सलमान होता आवडता अभिनेता

दिग्दर्शक सावन कुमार यांचा सलमान खान आवडता अभिनेता होता. दोघांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सलमानचे सुरुवातीचे 'सनम बेवफा' आणि 'चाँद का टुकडा' सारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. यामुळे सलमानला सुरुवातीच्या काळात ओळख निर्माण करता आली. २००६ साली त्यांनी 'सावन… द लव सीजन' हा चित्रपट सलमान खानला घेऊन केला. हा त्यांचा शेवटचा दिग्दर्शित केलेला चित्रपट ठरला.

सलमान खान ने व्यक्त केले दु:ख

सावन कुमार यांचे निधन झाल्यावर त्यांचा आवडता अभिनेता सलमान खाने याने दु:ख व्यक्त केले आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, 'तुमच्या आत्म्यास शांती मिळो प्रिय सावन जी, नेहमी तुमच्यावर प्रेम केले व आदर केला.' असे लिहले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news