Badminton French Open : ‘फ्रेंच ओपन’ जिंकून सात्विक-चिराग जोडीने रचला इतिहास!

Badminton French Open : ‘फ्रेंच ओपन’ जिंकून सात्विक-चिराग जोडीने रचला इतिहास!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : badminton french open : फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार जोडीने इतिहास रचला आहे. पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने चायनीज तैपेईच्या लू चिंग याओ आणि यांग पो हान यांना सरळ गेममध्ये पराभूत केले. याचबरोबर या स्ट्रार जोडीने फ्रेंच ओपन सुपर 750 चे विजेतेपदावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. (satwiksairaj rankireddy and chirag shetty badminton french open win first indian pair)

सात्विक आणि चिराग यांची ही जोडी 2019 च्या स्पर्धेत उपविजेते ठरली होती. सध्या ही जोडी जागतिक क्रमवारीत 8 व्या क्रमांकावर आहे. काल फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सात्विक-चिराग जोडीने 25 व्या मानांकित लू आणि यांग यांचा 48 मिनिटांच्या लढतीत 21-13, 21-19 असा सरळ गोन गेममध्ये पराभव केला. सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकणारे सात्विक आणि चिराग हे पहिले भारतीय ठरले आहेत. (satwiksairaj rankireddy and chirag shetty badminton french open win first indian pair)

अनेक रेकॉर्ड आधीच नावावर…

सात्विक आणि चिराग या भारतीय पुरुष जोडीने यंदाही आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत चिराग-सात्विकने कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय त्यांनी इंडियन ओपन सुपर 500 चे विजेतेपद, कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड आणि थॉमस कपचे विजेतेपद पटकावले होते.

2019 च्या थायलंड ओपन सुपर 500 आणि इंडिया ओपन सुपर 500 नंतर या जोडीचे हे तिसरे वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. दोन्ही संघांमधील आक्रमक सामन्यात सात्विक आणि चिराग यांनी दमदार खेळ करत विजय मिळवला. दोघेही नेटवर बरोबरीचे राहिले आणि त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. (satwiksairaj rankireddy and chirag shetty badminton french open win first indian pair)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news