

सातारा पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात मेटतळे नजीक मध्यरात्री दरड कोसळली. रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे,
माहितीनुसार, गेले काही दिवस कोसळणाऱ्या धुवाधार पाऊस सुरु आहे. या पावसाने महाबळेश्वर – प्रतापगड मुख्य रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये मेटतळे गावानजीक बुधवारी (दि.२७) मध्यरात्री दरड कोसळली. माती व दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी (दि.२९) सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जेसिबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरु होते दरड हटविलानंतर वाहतूक पुर्ववत सुरु होणार आहे.
हेही वाचा