

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : रिसोड तालुक्यातील घोंसर ग्रामपंचायतीचा प्रभारी सरपंचाला घरकुल मंजुरीसाठी ५००० रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील घोंसर येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीस शबरी अम्मा घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यासाठी घोंसल ग्रामपंचायतीच्या अतिरिक्त कार्यभार सरपंच संतोष रंगनाथ घुकसे (वय 32) याने ५००० रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल होताच एसीबी ने सापळा रचला.
संतोष रंगनाथ घुकसे याला ५००० रुपयाची लाच स्वीकारताना जिल्हा मध्यवर्ती बँक रिसोड परिसरात एसीबीने अटक केली.