sara ali khan
sara ali khan

Sara Ali Khan : Zara Hatke Zara Bachke रिलीजपूर्वी सारा अजमेर शरीफच्या दर्शनाला

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सारा अली खानने आपला चित्रपट 'जरा हटके जरा बचके'च्या रिलीजआधी (Sara Ali Khan) राजस्थानच्या अजमेर शरीफ दरगाह येथे चाऊन चादर अर्पण केली. याआधी ती विक्की कौशलसोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूर जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दिसली होती. साराचा अजमेर शरीफ दरगाह येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sara Ali Khan)

दर्गाह पोहोचली सारा अली खान

अजमेर शरीफ दरगाहला जाताना साराने मिंट ग्रीन सलवार सूट परिधान केला होता. एका पॅपराझी अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ती दरगाहच्या एका भिंतीवर धागा बांधताना आणि प्रार्थना करताना दिसते. तिच्या आजूबाजूला फॅन्सची गर्दी दिसतेय. साराचा विकी कौशल सोबत जरा हटके जरा बचके चित्रपट २ जूनला रिलीज होतोय.

सारा नुकताच कान चित्रपट महोत्सवात डेब्यू करून मुंबईत परतलीय. लक्ष्मण उतेकर यांचा 'जरा हटके जरा बचके' रिलीजसाठी सज्ज आहे. सारा, विक्की कौशलशिवाय शारिब हाशमी, राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news