Saptashringi : सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवात 256 सीसीटीव्हीचा वॉच, 26 पासून प्रारंभ

सप्तशृंगीगड
सप्तशृंगीगड
Published on
Updated on

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचे अर्धशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगदेवीच्या (Saptashringi) गडावरही नवरात्रोत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार असून, दि. 26 सप्टेंबरपासून होणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासन, सप्तशृंग ट्रस्ट तसेच व्यापाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्या दृष्टीने सहजिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत नुकतीच नियोजन बैठक घेण्यात आली.

कोरोनामुळे गत दोन वर्षे यात्रोत्सव बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने व निर्बंध रद्द करण्यात आल्याने (Saptashringi) गडावरील नवरात्रोत्सव धूमधडाक्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नियोजन बैठकीत भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सोयी-सुविधा पुरविण्याबाबत सहजिल्हाधिकारी मीना यांनी सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने मंदिरात भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिकेड्स तसेच मंदिर परिसरासह विविध ठिकाणी 256 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रवेशद्वारजवळ नियोजन कक्ष स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या शिवाय वनविभाग हद्दीत बाहेरून आलेल्या विक्रेत्यांना दुकाने थाटण्यास बंदी करण्यात आली आहे. एसटी बसेसचा संप असल्याने इतर कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार आहेत. नांदुरी ते सप्तशृंगगड या 10 कि.मी. अंतरावरील घाटात येण्या- जाण्यासाठी विशेष सुविधा केली जाणार आहे. नांदुरी येथे मेळा बसस्थानकाची सुविधा करण्यात आली आहे. गडावरही बसस्थानकाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जादा बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे. या बैठकीस तहसीलदार बंडू कापसे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, गटविकास अधिकारी पाटील, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, देवी संस्थानचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, संदीप डेमसे, एसटी महामंडळाचे पगार यांच्यासह सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, देवी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त

गडावर (Saptashringi) भाविकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला जाणार असून, एक अपर पोलिस अधीक्षक, दोन डीवायएसपी, 12 पोलिस निरीक्षक, 250 पोलिसांसह होमगार्ड हे बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. तसेच वनविभागाचे 15 कर्मचारी असणार आहेत. विशेष म्हणजे कचऱ्याबाबत नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर, दुकानदारांवर कारवाईसाठी 6 स्वत्रंत्र कर्मचारी तसेच अन्न प्रशासनाने कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी सर्व खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 14 कर्मचारी असणार आहेत. ग्रामपंचायतीमार्फत साफसफाईसाठी 60 कर्मचारी तैनात असणार आहेत. या शिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

नांदुरी येथून गडावर 70 बसेस धावणार

गडावर पाच ठिकाणी आरोग्य केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच फिरते वैद्यकीय पथक असणार आहे. नांदुरी येथेही आरोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड दरम्यान 70 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर ठिकाणांहून 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news