Multi star Movies : सान्या ते कियारापर्यंत या अभिनेत्रींची मल्टिस्टार चित्रपटांनी भरलीय झोळी

सान्या-क्रिती-कियारा
सान्या-क्रिती-कियारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपटसृष्टी हा सतत विकसित होणारा उद्योग आहे, असं म्हणणं वावग ठरणार नाही. आजच्या घडीच्या अभिनेत्री वेगळ्या विषयावर चित्रपट करण्यात अष्टपैलू भूमिका स्वीकारण्यात आणि चित्रपटात एकमात्र फोकस करून जुना स्टिरियोटाईपच्या पलिकडे जाऊन काम करण्यावर भर देतात. (Multi star Movies) सान्या मल्होत्रा ही बॉलीवूडमधील एक टॅलेंटेड अभिनेत्री आहे. सोबतीला कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉन यांसारख्या अभिनेत्रीही या श्रेणीत येतात. स्वतःच्या भूमिका उत्तम साकारून नेहमीच त्या मल्टी-स्टार चित्रपट करतात. या मल्टी स्टार अभिनेत्रीचा हा खास प्रवास- (Multi star Movies)

सान्या मल्होत्रा

नेहमीच उत्तम चित्रपट करून आपल्या आकर्षक कामाने प्रेक्षकांची मन जिंकणारी म्हणून या अभिनेत्रीचे नाव घेतलं जात. सान्या मल्होत्राने वेळोवेळी सिद्ध केले आहे की ती मल्टी-स्टारर चित्रपटांच्या आव्हानापासून मागे हटणारी नाही. भावनिकरित्या भरलेल्या स्पोर्ट्स ड्रामा दंगलपासून ते हृदयस्पर्शी कॉमेडी-नाटक बधाई हो आणि आणि हटके कॉमेडी लुडो पर्यंत सान्याने तिच्या मोहक कामगिरीने प्रेक्षकांवर अमिट छाप सोडली आहे. मल्टी-स्टारर प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त, फोटोग्राफ, पॅग्लाईट आणि कथल यांसारख्या चित्रपटांमध्ये सान्याचा परफॉर्मन्स ने सगळ्यांची मन जिंकली.

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी तिच्या हसऱ्या आणि करिष्माई स्वभासाठी ओळखली जाते. तिने अनेक मल्टी-स्टारर चित्रपट केले आणि स्वतःचा ठसा उमटवला आहे. विनोदी चित्रपट गुड न्यूज, ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी भूल भुलैया २ आणि हिट कौटुंबिक सिनेमा जुगजुग जीयो यासारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाने सिद्ध केले आहे की ती नेहमीच दर्जेदार काम करू शकते.

क्रिती सेनॉन

तिच्या प्रभावी अभिनय चॉप्ससह क्रिती सेनॉनने मल्टी-स्टारर चित्रपटांमध्ये स्वत: ची जादू दाखवली आहे. स्टार-स्टडेड अॅक्शन-कॉमेडी दिलवालेपासून ते हाऊसफुल्ल ४ पर्यंत तिने इतर प्रतिभावान स्टार्ससोबत चमकण्याची तिची क्षमता सातत्याने दाखवली आहे.

सान्या मल्होत्रासाठी दिग्गज शाहरुख खानने प्रसिद्ध केलेला जवान हा तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे, ज्यात दीपिका पदुकोण, नयनतारा आणि प्रियामणी यासारख्या अभिनेत्री झळकणार आहेत. जवानाशिवाय तिच्याकडे विकी कौशलसोबत सॅम बहादूर हा बहुचर्चित चित्रपट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news