

पुढारी ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणुकांदरम्यान देशभरातील राजकीय वातावरण तापत चालले आहे. अनेक राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्ते प्रचारांच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान आम आदमी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. या पार्श्वभूमीवर आपचे खासदार संजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Sanjay Singh met Mallikarjun Kharge)
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीबाबत आप खासदार संजय सिंह म्हणतात, "ते सभागृहात आम्हाला प्रोत्साहन देतात. ते आमचे विरोधी पक्षनेते (LoP) आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतर मला त्यांची भेट घेऊन आगामी लढ्यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. दुसरे म्हणजे आम्ही INDIA Alliance's Common Minimum Program (CMP) जारी करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. लोकसभेनंतर इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर आम्ही हे मुद्दे लोकांसमोर ठेवू…." असे देखील आप खासदार संजय सिंह यांनी 'एएनआय'शी बोलताना स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा: